अष्टविनायक गणपतींचा इतिहास आणि माहिती; पाचवा गणपती
Pckhabar-पीसी खबरच्या वाचकांसाठी अष्टविनायक गणपती, पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ गणपती, लाल बागचा राजा या महत्वाच्या गणपतींची माहिती आपणापर्यंत पोहचविण्याच्या मालिकेतील आजचा पाचवा गणपती –
थेऊरचा श्री चिंतामणी
हे मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे 22 किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.
श्री चिंतामणी मंदिर आणि परिसर
चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.
चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.










Leave a Reply