बनावट नोटा प्रकरणात आणखी तीन जण गजाआड

बनावट नोटा प्रकरणात आणखी तीन जण गजाआड
Pckhabar- घरात बनावट नोटांचा छापखाना सुरू करून
चलनातील दोन हजाराच्या नोटा छापण्याच्या प्रकरणात आणखी तीन आरोपींना पिंपरी पोलीसांनी गजाआड केले.

सुरेश भगवान पाटोळे (वय ४०, रा. आनंदवन आश्रम, फुगेवाडी), प्रमोद अमृत गायकवाड (वय ३९) यांच्यासह अभिषेक प्रदीप कटारिया (वय १९, रा. आनंद
पार्वâ, थेरगाव), ओंकार शशिकांत जाधव (वय १९, रा. केशवनगर, चिंचवड) या चार जणांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. अख्तर इक्बाल अकबर मिर्झा (वय
५७), खलील अहमद अब्दुलहमीद अन्सारी (वय ४०) आणि नयूम रहीमसाहेब पठाण (वय ३३) या तिघांना आता अटक करण्यात आली आहे.
आरोपी पाटोळे याने अभिषेक कटारिया यांच्याकडून काही पैसे उसणे घेतले होते. कटारीया यांनी वेळोवेळी
तगादा लावल्यावर पाटोळेने त्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, १६ ऑगस्ट रोजी पाटोळेने कटारीया आणि जाधव यांना २ लाख ९८ हजार रूपये दिले. मोटारीतून हे पैसे घेऊन जात असताना त्यांना पोलीसांनी पकडले आणि बनावट नोटांचा हा प्रकार समोर आला. आरोपी अख्तर हा एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत असल्याने त्याच्या मदतीने पाटोळे याच्या फ्लॅटवर
बनावट नोटा छापण्याचे काम सुरू केले. साध्या कागदापासून ही टोळी नोटा तयार करत होती. त्यांनी ६ लाखांच्या बनावट नोटा छापल्या. काही नोटांवर रंग पसरल्याने त्या चलनात आणल्या नाहीत. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *