…अन्यथा महापालिकेत मोकाट कुत्री सोडू  

…अन्यथा महापालिकेत मोकाट कुत्री सोडू  
Pckhabar- गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागात गर्दीच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा; अन्यथा महापालिका भवनात मोकाट कुत्री सोडण्यात येतील, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, अगोदरच कोरोना महामारीमुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यारस्त्यावर मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. शहराच्या विविध भागात लहान मुलं, महिलांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रस्त्यांवरून ये जा करणार्‍या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पुढे अचानक ही मोकाट कुत्री येऊन अपघात देखील झाले आहेत. तसेच मोकाट कुत्र्यांकडून दुचाकी वाहनाचा पाठलाग करणे असे प्रकार घडत आहेत. अशा अपघातात अनेकांना मोठी दुखापत होत आहे. यामधील काही जणांना तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे.
येत्या आठ दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर संभाजी ब्रिगेड महानगरपालिकेत मोकाट कुत्री आणून सोडेल, अशा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते आणि जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *