सत्ता प्रतिष्ठानतर्फे गुणवंत कामगारांचा गौरव
Pckhabar- नवी सांगवी येथील सत्ता प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवाअंतर्गत सेवा सप्ताहचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी जिल्हा रूग्णालयाच्या आवारात 50 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. 10 व 12 वीतील विशेष प्राविण्य घेतलेल्या प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच गुणवंत कामगारांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र कामगार कल्याण मडळाने (महाराष्ट्र शासन)महाराष्ट्रातून पन्नास गुणवताची निवड केली आहे. त्यामध्ये शहरातील पाच गुणवंताचा समावेश आहे. शिवराम गवस, मार्शल कंपनी, संगिता जोगदंड, धर्मवीर बँक, शंकर नानेकर, महिंद्रा सीआई, दत्तात्रय अवसरकर, इस्माईल मुल्ला, दोघे टाटा मोटर या सर्व गुणवंताचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रतिष्टानचे संस्थापक सौरभ शिंदे म्हणाले, आम्ही दररोज समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये अपंगांना मदत, कोरोना योद्धांचा सन्मान, पालीकेच्या आरोग्य विभागातील साफसफाई करणार्या महीलांचा सन्मान, रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उमेश खंदारे, पिंपरी युवा सेना प्रमुख, अभिजित गोफणे, अध्यक्ष अमित जगदाळे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष अविनाश मेश्राम, अर्णव कामठे, ओंकार पवार उपस्थित होते.
सत्ता प्रतिष्ठानतर्फे गुणवंत कामगारांचा गौरव







Leave a Reply