श्री गणेशाच्या आवडत्या ‘२१ वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग’ (भाग-२)
डॉ. अंकुश जाधव
Pckhabar- श्री गणेशाच्या आवडत्या ‘२१ वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग’ याबाबत आपण काल भाग एक वाचला होता. आज भाग दोन…
८)शमी-या वनस्पती बद्दल तीन कथा प्रचलित आहेत. ही पापाचे नाश करते म्हणून हिला
पापनाशनी असे एक पर्यायी नाव आहे.ही अरुची,आव पडणे,रक्तपित्त, आमवात,श्वास-कास, त्वचारोग इ.रोगात उपयोगी आहे.
९)आघाडा-शारिरीक दोष म्हणजे वात, पित्त व कफ या दोषांना दूर करणारा , त्यांची शुद्धी करणारा आहे म्हणून यास अपामार्ग असे एक पर्यायी नाव आहे.हा स्थौल्य( जाडी), गंडमाळा, मूळव्याध, उलटी होणे, खाज येणे इ.रोगात उपयोगी आहे. याच्या क्षारा पासून क्षारसूत्र बनवितात त्याचा उपयोग भगंदर, मूळव्याध यात केला जातो.
१०) डोरली, बृहती- वांग्याच्या झाडा प्रमाणे दिसणारे हे छोटे झाड असते.ते वांग्याच्या झाडाप्रमाणे दिसते म्हणून यास वार्ताकी असे एक पर्यायी नाव आहे.हिचा उपयोग ज्वर, दमा, तोंडाला चव नसणे,त्वचारोग, खोकला इ.रोगात केला जातो.
११) कण्हेर-ही विषारी आहे म्हणून हिचा समावेश विषवर्गात केला आहे. ही घोड्यांना मारणारी आहे म्हणून हिला अश्वघ्न असे एक पर्यायी नाव आहे.
१३)रुई, अर्क-शंकरच्या प्राप्तीसाठी पार्वतीने बारा वर्षे निराहार राहून तप केले व या व्रताची समाप्ती रुईचे पान चाटून केले.हिच्या सर्वांगातून चीक निघतो म्हणून यास क्षीरपर्ण असे एक पर्यायी नाव आहे.हिचा उपयोग त्वचारोग,पोटात गोळा येणे,पोटात पाणी होणे,भगंदर इ.रोगात केला जातो.हिच्या चिकाचा उपयोग करून क्षारसूत्र तयार केले जाते त्याचा उपयोग भगंदर, मूळव्याध इ.आजारात केला जातो.
१४)अर्जुन-ही हृदय रोगात प्रसिद्ध असलेली वनस्पती आहे.याचा विस्ताराने मोठा वृक्ष असतो म्हणून यास कुकुंभ असे एक पर्यायी नाव आहे.याचा उपयोग ह्रदयाचे आजार ,रक्तविकार, मधुमेह, जाडी वाढणे इ.आजारात केला जातो. हिच्या सालीचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
१५)सांखवेल,विष्णुक्रांता- पोटात गॅस होणे,ज्वर,आतड्याचे आजार इ.आजारात हिचा उपयोग केला जातो.तसा हिचा औषध म्हणून फारसा उपयोग केला जात नाही.
१६) डाळिंब-हे अत्यंत रुची आणणारे,रुचकर आहे म्हणून याला रोचक असे एक पर्यायी नाव आहे. याच्या फळ, साल, मूळ, फुले या अवयवांचा उपयोग औषधात करतात. हृदय विकार, जुलाब होणे, लघवीला साफ न होणे, ज्वर, अशक्तपणा, उलट्या, आम्लपित्त, अरुची, मेंदूचा अशक्तपणा इ. आजारात याचा उपयोग होतो.
१७)देवदारू-देवांचा व याचा संबंध नावावरूनच स्पष्ट होतो. देवदेवतांच्या प्रदेशात(हिमालयात) असणारा हा वृक्ष असल्याने यास सुरभुरूह असे एक पर्यायी नाव आहे.याच्या लाकूड, साल व तेल यांचा उपयोग औषध म्हणून करतात.याचा उपयोग मधुमेह,त्वचारोग,सूज,उचकी इ.आजारात करतात. हा मुख्यतः भूत नाशक म्हणून सांगितला आहे.
१८) मरवा, मरुबक- या वनस्पती चा औषध म्हणून फारसा उपयोग केला जात नाही. जंत,पोटात दुखणे, भूक न लागणे इ.आजारात याचा उपयोग केला जातो.
१९)पिंपळ-हा पवित्र आहे म्हणून यास मांगल्य असे एक पर्यायी नाव आहे.औषधात याच्या साल,राख,कोवळी व सुकी पाने,फळे ,डिंक यांचा उपयोग केला जातो.रक्ताचे विविध विकार,योनिरोग,अरुचि, जखमा इ.आजारांवर याचा उपयोग होतो.हा रक्त शोधक व विषनाशक आहे.
२०)जाई-ही वेल मनाला प्रसन्न करणारी असल्याने हिला सुमना असे एक पर्यायी नाव आहे. औषधात पाने,फुले,मूळ यांचा वापर केला जातो.तोंड येणे, डोळ्याचे विकार, त्वचारोग इ.आजारांवर हिचा उपयोग केला जातो.
२१)केवडा, केतकी- याच्या मूळ,फळ व फुले यांचा वापर औषधात करतात.पाळीच्या वेळी अंगावरून जास्त जाणे, सर्वांगाची आग होणे, मधुमेह, ताप इ .आजारात याचा उपयोग केला जातो.
कोणत्याही वनस्पतीचा औषध म्हणून उपयोग डॉक्टरच्या सल्ल्याने करणे उचित होईल.










Leave a Reply