इंद्रायणी आय हाॅस्पिटलचे उद्घाटन
Pckhabar- बुलढाणा येथील चिखली येथे इंद्रायणी आय हाॅस्पिटल ॲण्ड ॲडव्हान्स केअर सेंटरचे बुलढाणा विधानसभेचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले.
चिखलीतील बस स्टॅण्ड रोड, डॉ. गुप्ता हाॅस्पिटल जवळ, कोठारी काॅम्प्लेक्स येथे सुरू करण्यात आलेल्या इंद्रायणी आय हाॅस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी अहमदपुरच्या सरपंच ललिता विष्णू मलोडे, इंद्रायणी आय हाॅस्पिटल ॲण्ड ॲडव्हान्स केअर सेंटरचे संचालक डॉ. संतोष सोमटकर, भास्कर सोमटकर, प्रयागबाई सोमटकर, वृषाली सोमटकर, गजानन सोमटकर, स्वाती सोमटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा
•सर्व प्रकारच्या मेडिक्लेम व कॅशलेश सुविधा
•कॉम्प्युटरने चष्म्याचा नंबर तपासणे
•बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगरोपण
•अत्याधुनिक मशिनव्दारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया व घडीचे भिंगरोपण
•काचबिंदू निदान व उपचार
•तिरळेपणा उपचार व शस्त्रक्रिया
•नासूर शस्त्रक्रिया
•काळ्या बुब्बुळावरील पडयाची शस्त्रक्रिया
•अल्ट्रासोनोग्राफी यंत्रणा
•नेत्रपटल तपासणी व उपचार
•कॉन्टेक्ट लेन्स क्लिनिक
•डोळ्याच अपघातावर उपचार
•लेसर सेंटर










Leave a Reply