’संधिविकार प्रकार आणि उपचार’ या विषयावर आज ऑनलाईन व्याख्यान

’संधिविकार प्रकार आणि उपचार’ या विषयावर आज ऑनलाईन व्याख्यान
Pckhabar- महाराष्ट्र असोशिएशन ऑफ आयुर्वेद विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्या वतीने  मास जनप्रबोधनपर व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. या व्याख्यानमाला अंतर्गत आज (सोमवार) सायंकाळी पाच वाजता पुण्यातील संधिविकार तज्ञ डॉ. लक्ष्मी वाप्राणी यांचे ’संधिविकार प्रकार आणि उपचार’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे.

मास जनप्रबोधनपर व्याख्यानमालामध्ये अनेक दिग्गजांनी व्याख्यानामार्फत जनजागृती केली आहे. आत्तापर्यंत 54 तज्ञांनी व्याख्याने दिली असून 55 वे पुष्प  संधिविकार तज्ञ डॉ. लक्ष्मी वाप्राणी हे गुंफणार आहेत. हे व्याख्यान https://www.facebook.com/jaymaasd.org/
या पेजवर पाहण्यास मिळणार आहे.

मास जनप्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन मास केंद्रीय समितीचे अध्यक्ष डॉ. रामदास गर्जे, डॉ. सुजित धुंदळे, खजिनदार डॉ. हितेंद्र भदाणे, संघटक डॉ. नितीन पाटील, संयोजक डॉ. सीमा गर्जे, डॉ. गणेश पझई, डॉ. अभिजीत होटकर यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *