श्री गणेशाच्या आवडत्या ‘२१ वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग’: वाचा डॉ. अंकुश जाधव यांचा माहितीपूर्ण लेख

श्री गणेशाच्या आवडत्या ‘२१ वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग’: वाचा डॉ. अंकुश जाधव यांचा माहितीपूर्ण लेख
भाग-१
Pckhabar- कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाची पूजा करून केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा करताना निरनिराळ्या २१ वनस्पतींची पाने श्रीगणेशास अर्पण केली जातात. या पानांच्या अर्पणाने श्रीगणेश प्रसन्न होतात, भक्तांची मनोकामना पूर्ण करतात. या वनस्पती अर्पण करण्यामागे ही एक आख्यायिका आहे.
एक अनालासूर नावाचा महा भयंकर, दुष्ट राक्षस होता. हा लोकांना खूप त्रास देत होता. एके दिवशी या राक्षसाने श्रीगणेशाशी युद्ध पुकारले. श्रीगणेशाने त्यास मारण्याचा खूप प्रयत्न केला. त्यास मारले तरी तो आपल्या शक्तीने पुन्हा जिवंत होई. शेवटी श्रीगणेशाने महाविराट रूप धारण केले व त्या राक्षसास गिळून टाकले. त्यामुळे श्रीगणेशाच्या अंगाची लाही लाही झाली, दाह झाला.तो काही केल्या कमी होईना, तेव्हा त्यांना तुळशी, बेल, दुर्वा इ. वनस्पतींचा रस पिण्यास पिण्यास दिला गेला. तेव्हा श्रीगणेशाच्या अंगाची लाही लाही, दाह थांबला. तेव्हा पासून या वनस्पती गणेशाना प्रिय झाल्या.
या २१ वनस्पतींना औषधी गुणधर्म आहेत. यांच्या उपयोगाने विविध सामान्य आजार बरे होतात. या २१ वनस्पतीं सामान्यतः कोणत्या आजारांवर उपयोगी आहेत ते पाहूया.
१)मधुमालती- ही वसंत ऋतूत अधिक प्रमाणात फुलते म्हणून ही वासंती असे एक पर्यायी नाव आहे. हिचा उपयोग खोकला, अंगाची आग होणे, त्वचारोग, फार तहान लागणे, दमा इ.आजारांवर केला जातो.
२)माका, भृंगराज- केसांची वाढ करणारा असल्याने यास कश्य असे ही एक पर्यायी नाव आहे. केस अकाली गळणे, पांढरे होणे, डोकेदुखी, लघवीची जळजळ होणे, जंत इ.रोगांवर याचा उपयोग होतो.
३)बेल- याचे पिकलेले फळ खाल्ल्याने कीटकांचा, पूयाचा नाश होतो. म्हणून यास पुतिमारुत असे एक पर्यायी नाव आहे. ज्वर, जुलाब होणे, आव पडणे, मूळव्याध, मधुमेह इ. आजारात याचा उपयोग केला जातो.
४)दुर्वा,हराळी- दुर्वा बद्दल काही कथा आहेत. ही अमृता प्रमाणे कार्य करते म्हणून हिला अमृता असे एक पर्यायी नाव आहे. विविध त्वचा व रक्त विकार, वारंवार तहान लागणे, अंगाची आग होणे, पित्त विकार, नेत्र रोग इ.आजारांवर करतात.
५)बोर-हे बकरींना आवडते म्हणून यास अजप्रिया असे एक पर्यायी नाव आहे. वारंवार तहान लागणे, रक्त व त्वचा विकार, अंगाची आग होणे इ.आजारांवर याचा उपयोग होतो.
६)धोतरा- हा शंकरांना प्रिय असल्याने यास शिवप्रिय असे एक पर्यायी नाव आहे. याचा उपयोग त्वचारोग, ताप, जंत, जखमा इ.आजारात होतो. हा विषारी असल्याने याचा उपयोग शक्यतो करू नये.
७)तुळस-तुळशीच्या उत्पत्तिबद्दल अनेक पौराणिक व लोककथा प्रचलीत आहेत. ही सहज सर्वत्र उपलब्ध होते, म्हणून हिला सुलभा असे तसेच ही कीटकांचा, कृमी चा नाश करणारी आहे म्हणून हिला भूतघनी असे ही पर्यायी नाव आहे. रक्त व त्वचारोग, लघवीचे विविध विकार, दमा, खोकला इ. आजारात उपयोगी आहे. आता कोरोनाच्या साथीत विषाणू, जिवाणू नाशक गुणामुळे हिचा कोरोना प्रतिबंधक म्हणून मोठया प्रमाणावर उपयोग केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *