घरगुती बाप्पाचे फोटो पाठविण्याचे आवाहन!

घरगुती बाप्पाचे फोटो पाठविण्याचे आवाहन!
Pckhabar- गणपती बाप्पा मोरया…आजपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या pckhabar. Comच्या सर्व वाचकांना खूप-खूप शुभेच्छा ! कोरोनाच्या या जागतिक महामारीमुळे  गणेशोत्सवावर अनेक बंधने आली आहेत. मात्र, प्रशासनाने घालून दिलेले नियम आणि अटींचे पालन करून आपण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करू. विघ्नहर्त्यांकडे कोरोनाचे हे विघ्न लवकर दूर करावे, अशी प्रार्थना करू.

Pckhabar.com च्या वाचकांसाठी तुमच्या घरी बसविण्यात आलेल्या गणरायाचा आणि तीन दिवसांनी येणाऱ्या गौराईचे आपल्या कुटुंबासमवतेचा फोटो अथवा बाप्पासोबतचा सेल्फी आम्हाला पाठवावा. तसेच कुटुंबातील सदस्यांची नावे, किती दिवसांचा गणपती असतो याची थोडक्यात माहिती पाठवावी.  आम्ही तुमच्या बाप्पासोबतच्या फोटोला pckhabar. Com या न्यूज पोर्टलवर प्रसिध्दी देऊ. त्यासाठी pckhabar2020@gmail.com या मेल आयडीवर फोटो आणि माहिती पाठवावी.

संपादक
Pckhabar. Com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *