अष्टविनायक गणपतींचा इतिहास आणि माहिती
पहिला गणपती – श्री मयुरेश्वर, मोरगांव
Pckhabar- आजपासून आराध्यदैवत गणरायाच्या उत्सवाला मोठ्या आनंदात सुरूवात होत आहे. यंदा कोरोना महामारीमुळे उत्सवाला काही मर्यादा आल्या असली तरी हा उत्सव तितक्याच आनंदाने नियमांचे पालन करित साजरा करू. विघ्नहर्त्यांकडे आपण सर्वांनी कोरोनाचे हे विघ्न लवकर दुर करण्याची प्रार्थना करू.
तसेच pckhabar.com च्या वाचकांसाठी अष्टविनायक गणपती, पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ गणपती, लाल बागचा राजा या महत्वाच्या गणपतींची माहिती आपणापर्यंत पोहचविण्याची मालिका आजपासून.
पहिला गणपती – श्री मयुरेश्वर, मोरगांव
पुण्यापासून 55 किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गावी कर्हा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. या परिसराला ’भूस्वनंदा’ या नांवानेसुद्धा ओळखले जाते. मोरगांव याचा शब्दशः अर्थ मोरांचे गांव असा आहे. कोणे एके काळी या गांवाचा आकार हा मोराप्रमाणे तर होताच शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती. म्हणून या गांवाला मोरगांव म्हटले जाते. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.
श्री मोरेश्वर मंदिर आणि परिसर
अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फुट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत. मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहे. यामुर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. मंदिरात रिद्धी (बुद्धी) आणि सिद्धी (क्षमता) यांच्यासुद्धा मुर्त्या आहेत.







Leave a Reply