स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आळंदीचा 39 वा क्रमांक  

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आळंदीचा 39 वा क्रमांक  
2021 मध्ये पहिल्या दहात येण्याचा संकल्प  
Pckhabar- आळंदी नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या स्पर्धेत सहभागी होत असून यावेळी अधिकाधिक लोकसहभाग वाढवून शासनाच्या सुचानादेशांचे पालन करीत देशातील नगरपरिषदांमध्ये पहिल्या दहा नगरपरिषदामध्ये तीर्थक्षेत्र आळंदीचा क्रमांक मिळविण्याचा संकल्प केला असल्याची माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर व मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केला केला असल्याचे सांगितले. तसेच 2020 च्या सर्वेक्षणात नगरपरिषदेचा 39 वा क्रमांक आला आहे.
आळंदी नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण 2019 ला 141 वा क्रमांक होता.मात्र अधिकचे परिश्रम घेत मुख्याधिकारी समीर भुमकर यांचे मार्गदर्शनात व नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे नियंत्रणात स्वच्छ सर्वेक्षण 2020 ला आळंदी नगरपरिषदेने पश्चिम विभागात 46 वा क्रमांक तर राज्यात 39 वा क्रमांक पटकावून उत्कृष्ठ काम केले. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये एकूण 6000 गुणासाठी परिक्षा झाली. यात आळंदी नगरपरीषदेने 3597.76 इतके गुण मिळाले.  स्वच्छ सर्वेक्षण परिक्षेत शहरात घरोघरी विलगीकृत पध्द्तीने कचरा संकलन करणे, संकलन केलेल्या कच-यावर प्रक्रिया करणे शहरात मोफत शौचालय सुविधा पुरविणे शहरातील सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थित सक्षम करणे. शहरे शाश्वत बनविण्याच्या दुष्टीने उपाययोजना करणे.
     यासाठी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्षा मिरा पाचुंदे, मुख्याधिकारी समीर भुमकर, आरोग्य समिती सभापती सागर भोसले, विविधा विषय समिति सभापती,  नगरसेवक व नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचेसह सामाजिक संस्था, शाळा, नागरिक आणि पत्रकार यांनी केलेल्या प्रयत्नामुळे  2019 वर्षाच्या 141 व्या क्रमांकावरुन विभागात 46 वा व राज्यात 38 वा क्रमांक मिळणे शक्य झाल्याचे आरोग्य विभाग समिती सभापती सागर भोसले यांनी सागितले. आळंदी शहरात कार्तिकी यात्रा कालावधी मध्ये Garbage Free City परिक्षा होवु शकली नाही अन्यथा GFC चे 600 मार्क्स मिळवुन अधिक चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत अपेक्षित मानांकन मिळाले असत, असेे मुख्याधिकारी जाधव यांनी म्हणाले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *