भाजपच्या शैला मोळक, अनुप मोरे, वैशाली खाड्ये, समर कामतेकर यांना प्रदेशस्तरावर संधी

भाजपच्या शैला मोळक, अनुप मोरे, वैशाली खाड्ये, समर कामतेकर यांना प्रदेशस्तरावर संधी

Pckhabar- भाजप महिला आघाडीच्या प्रदेश कोषाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवड शहरातील शैला मोळक, भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी अनुप मोरे, युवती विभागाच्या सह संयोजिकापदी वैशाली खाड्ये, सोशल मिडीया संयोजकपदी समर कामतेकर यांची वर्णी लागली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा महाराष्ट्र संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांच्या सूचनेनुसार आगामी काळासाठीची भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची यादी जाहीर करण्यात आली आहे. महिला अध्यक्षा उमा खापरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी कार्यकारिणी जाहीर केल्या आहेत.

महिला आघाडीच्या कोषाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवड शहर भाजप महिला आघाडीच्या माजी शहराध्यक्षा शैला मोळक यांची नियुक्ती झाली आहे. तर, भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी अनुप मोरे, युवती विभागाच्या सह संयोजिकापदी वैशाली खाड्ये, सोशल मिडीया संयोजकपदी समर कामतेकर यांची वर्णी लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *