‘ऐच्छिक दान द्या, शाडू मातीची गणेशमूर्ती घेऊन जा’
Pckhabar-पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने ऐच्छिक दान दानपेटीत टाका व हवी ती शाडू मातीची व तुरटीचे गणेश मूर्ती घेऊन जा या उपक्रमाची सुरुवात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सुमारे पाचशे गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले कि तुरटी चे आपणासर्वांना खूप फायदे असून व शाडू मातीचे गणपती नागरिकांना ऐच्छिक दान पद्धतीने देऊन पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी हा उपक्रम खूप फायदेशीर ठरेल. यावेळी उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, नगरसेवक शत्रूघन(बापु)काटे, नगरसेविका निर्मला कुटे , व्हा.चेअरमन पवना सहकारी बँक जयनाथ काटे, पी के स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे , उद्योजक राजू भिसे, अशोक हिरामण काटे, राजेंद्रनाथ जयस्वाल, अशोक पटेल,अश्विनी भिसे , कविता भिसे, रुक्मिणी जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
मागील तीन वर्षांपासून ‘ ती ‘ चा गणपतीची स्थापना केली जात आहे. तसेच परिसरातील नागरिकांना शाडू मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्ती दिल्या जात आहेत . त्याचबरोबर गणेश मूर्ती घरीच विसर्जन करून त्या मातीमध्ये तुळशीचे रोपटे लावावेत म्हणून गणेश भक्तांना कुंडी व तुळशीचे रोपटे मोफत दिले जात आहे. यंदा उन्नति सोशल फाउंडेशन च्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच तुरटी पासून बनवलेल्या गणेश मुर्ती आणले आहेत. त्यामुळे पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करण्याचा मानस उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने राबविला जात आहे.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की घरच्या घरीच नागरिकांनी गणेश उत्सव साजरा करावा. म्हणून मागील तीन वर्षापासून आम्ही पर्यावरण पूरक शाडू माती पासून बनवलेल्या गणेश मूर्ती ऐच्छिक दान या उपक्रमाअंतर्गत गणेश भक्तांना गणेश मूर्ती देत आहोत.










Leave a Reply