वडापावची गाडी लावण्याच्या वादातून तरूणाचा खून; पाच आरोपींना अटक

वडापावची गाडी लावण्याच्या वादातून तरूणाचा खून; पाच आरोपींना अटक
  Pckhabar- वडापावची गाडी लावण्याच्या वादातून एका तरूणाचा सात जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने वार करून खून केल्याची घटना काळेवाडी येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

शुभम जर्नाधन नखाते (वय-22, रा. नखातेनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.  ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय-23), प्रविण ज्योतीराम धुमाळ (वय-21), अविनाश धनराज भंडारे (वय-23), अजय भारत वाकोडे (वय-23), मोरेश्वर रमेश आष्टे (वय-21) अशी अटक केलेलया आरोपींची नावे आहेत. राज तापकीर आणि प्रेम वाघमारे हे दोघे फरार आहेत. याप्रकरणी जर्नादन आत्माराम नखाते (वय-52) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम नखाते आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्यात वडापावची गाडी लावण्यावरून वाद होता. हा वाद मिटविण्यासाठी शुभमला आरोपींनी तापकीर चौकातील धोंडिराज मंगल कार्यालयात बोलावले. तिथेही पुन्हा शुभम आणि आरोपींमध्ये वाद झाला. याच वादातून आरोपींनी शुभमवर कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. काही तासाभरात पाच आरोपींना अटक केली. तर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *