मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात
Pckhabar- उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते.
दौऱ्यावर असताना आझमगडच्या बॉर्डरवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी मंत्री नितीन राऊत यांना ताब्यात घेतले आहे.










Leave a Reply