स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 24 वा तर राज्यात 7 वा क्रमांक
Pckhabar- केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 24 वा तर राज्यात 7 वा क्रमांक आला आहे. सर्वेक्षणाचा आज (गुरुवारी) निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान, मागीलवर्षी देशात 52 तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता. यंदा स्वच्छ सर्वेक्षणात शहराची सुधारणा झाली आहे.
व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता.
2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहर टॉप 10 मध्ये होते. शहराचा 9 वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून 1 नंबर आला होता. 2017 पासून त्यात घसरण सुरु झाली होती. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले. 9 व्या क्रमांकावर असलेले पिंपरी-चिंचवड शहर थेट 72 व्या नंबरवर फेकले गेले होते. तर, 2018 मध्ये देशात 43 वा क्रमांक आला होता. तर, राज्यात सहावा क्रमांक होता. 2019 मध्ये पुन्हा त्यामध्ये घसरण झाली होती. शहराचा देशात 52 वा तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता. यावेळी 2020 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात शहराची सुधारणा झाली आहे. देशात 24 वा तर राज्यात सातवा क्रमांक आला आहे.
याबाबत बोलताना पालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळेच 52 वरुन शहराचा नंबर 24 वर आला आहे. तर, राज्यात सातवा क्रमांक आहे. स्टार रेटिंग मिळाले नाही. त्यात 600 मार्क कमी पडले. ते मिळाले असते तर शहर 15 व्या नंबरवर आले असते. पुढच्यावर्षी दहाच्या आतमध्ये आणण्यासाठी आरोग्य विभागाचा प्रयत्न असणार आहे”.










Leave a Reply