चिंता संपली! पवना धरणात 78.87 टक्के पाणीसाठा

चिंता संपली! पवना धरणात 78.87 टक्के पाणीसाठा

Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 23 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून साठ्यात 1.86 टक्यांनी वाढ झाली आहे. तर, 1 जूनपासून 1266 मिली मीटर पाऊस झाला असून 43. 58 टक्यांनी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. एकूण 78.87 टक्के पाणीसाठा झाला आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची भिस्त पवना धरणावर अवलंबून आहे. पावसाळ्याचे जून, जुलै दोन महिने ओढ दिल्यावर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काही दिवस धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. यामुळे शहरवासीयांवरील अधिकच्या पाणीकपातीचे संकट टळले आहे.

गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 23 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. 1.86 टक्क्यांनी वाढ झाली असून 1 जूनपासून 1266 मिली मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे. पाणीसाठ्यात 43.58 टक्के वाढ झाली आहे.
धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने मावळ, पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांची पाण्याची चिंता संपली आहे.

पवना धरणातील पाणी साठ्याची आजची आकडेवारी!

💦 गेल्या २४ तासात झालेला पाऊस = 23 मि.मि.

💦 1 जूनपासून झालेला पाऊस = 1266मि.मि.

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 3121मि मी
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = 78.87 टक्के

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 99.70 टक्के

💦 गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 1.86 टक्के

💦 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 43.58 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *