Pckhabar- देहूगाव परिसरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी 10 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 302 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
आजपर्यंत 302 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 205 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 91 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजअखेर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply