सिरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या लसीचे 1600 स्वयंसेवकांना देणार डोस

सिरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या लसीचे 1600 स्वयंसेवकांना देणार डोस

Pckhabar- जीवघेण्या कोरोना विषाणू लसीसंदर्भात एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस सुरुवात केली आहे. या दरम्यान, 1600 स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर ही लस किती सुरक्षित आणि प्रभावी आहे हे अभ्यासले जाणार आहे.

ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडियाने (डीसीजीआय) याच महिन्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस परवानगी दिली होती. त्यानंतर आता 18 वर्षांवरील 1600 स्वयंसेवकांना हा डोस देण्यात येणार आहे. देशातील 17 ठिकाणी ही चाचणी करण्यात येणार आहे.

सेठ जीएस मेडिकल कॉलेज अँड केईएम हॉस्पिटल (मुंबई), बीजे मेडिकल कॉलेज आणि सासून जनरल हॉस्पिटल (पुणे), भारतीय विद्यापीठ डीम्ड यूनिवर्सिटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (पुणे), जहांगीर हॉस्पिटल (पुणे), टीएन मेडिकल कॉलेज आणि बीवाईएल नायर हॉस्पिटल (मुंबई), गवर्नमेंट मेडिकल कॉलेज (नागपूर) येथे ही चाचणी घेण्यात येणार आहे.

स्वयंसेवकांना दोन डोस देण्यात येतील. यातील एक पहिल्या दिवशी आणि दुसरा 29 व्या दिवशी देण्यात येणार आहे. स्वयंसेवकांना 0.5 एमएलचा डोस देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *