महाराष्ट्र सरकारला धक्का; पार्थ पवार म्हणतात ‘सत्यमेव जयते’
Pckhabar-बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून आता सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टानेही आज महत्त्वपूर्ण निकाल देत मुंबई पोलिसांना या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयकडे देण्यास सांगितले. सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
‘मुंबई पोलीस सुशांत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशीची गरज नाही,’ अशी भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर धक्का बसला आहे. मात्र असं असलं तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केलं आहे.
‘सत्यमेव जयते’, असं सूचक ट्वीट पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनीरित्या फटकारल्यानंतरही पार्थ पवार याप्रकरणी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहेत.










Leave a Reply