सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सुप्रीम कोर्टाचा निकाल

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; सुप्रीम कोर्टाचा निकाल

सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.

Pckhabar- अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज (बुधवारी) दिला आहे.  सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.

14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत गेला होता. त्याचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा पोलिसांकडे रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पाटणा पोलिसांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *