गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा- महापौर उषा ढोरे यांचे आवाहन

 

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा- महापौर उषा ढोरे यांचे आवाहन
Pckhabar-कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या अभूतपूर्व कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी शहरातील नागरिकांनी यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा. व सर्व गणेश मंडळानीही सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने  साजरा करुन मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.

गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाच्या मुर्तीच्या उंचीपेक्षा मनातील भाव मोठा असला पाहिजे. म्हणून यावर्षी गणेश मुर्ती ही पर्यावरणपूरक शाडूची असावी व सदर मुर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास गणेशमुर्ती स्वंयसेवी संस्थाना मुर्तीदान कराव्या जेणेकरून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटंबियांचे कोरोना साथीपासून रक्षण होईल. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरती, अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी शासनाचे व महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे व तरतुदींचे पालन करावे. गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक लाईव्ह इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी व्यक्तींमध्ये कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी. तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी मंडळानी आरोग्य शिबीरे, रक्तदान व प्लाझमा दान शिबिरे यासारखे उपक्रम राबविणेस प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोव्हीड योध्दे व स्वंयसेवक म्हणून पुढे यावे. मुर्तीदान करण्यासाठी महापालिकेच्या अ क्षेत्रिय कार्यालय 020-27650154, ब क्षेत्रिय कार्यालय 020-27450153, क क्षेत्रिय कार्यालय 020-27122969, ड क्षेत्रिय कार्यालय 9607957008, इ क्षेत्रिय कार्यालय 020-27230410, फ क्षेत्रिय कार्यालय 020-27650324, ग क्षेत्रिय कार्यालय 7887868555, ह क्षेत्रिय कार्यालय 020-27142503 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मुर्तीदान करण्याच्या उपक्रमास स्वंयसेवी संस्थानी आपल्या सेवेसंदर्भात क्षेत्रिय अधिकार्‍यांकडे संपर्क साधावा. असे आवाहनही महापौर ढोरे व सत्तारुढ पक्षनेते  ढाके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *