डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी
Pckhabar- पिंपरीतील सेनादलाच्या डेअरी फ़ार्मजवळ रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास सेनादलाने हिरवा कंदील दाखवला असल्याने आता हे काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन कर्नल ग्यानप्रकाश यांनी महापालिकेला 8081 चौरस मीटर क्षेत्रावर काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. पिंपरीगाव व परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे. याबाबत भाजपचे स्थानिक नगरसेवक संदीप वाघेरे यांनी, निवडून आल्यानंतर याविषयाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात करण्यात आली होती. ड्डाणपुलाचे काम त्वरीत मार्गी लागण्यासाठी त्यांनी स्वत: दिल्ली येथे जाऊन तेव्हाच्या संरक्षणमंत्री निर्मलाजी सीतारामन यांची भेट घेऊन हा पूल होण्याची गरज त्यांच्या निदर्शनास आणली होती.
महापालिकेने यासाठी 2 कोटी 86 लाख 87 हजार 651 रुपये संरक्षण विभागाकडे जमा केले आहेत. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच या मंजुरीमुळे भुयारी मार्ग साई चौक, शगुन चौक पुलावरील वाहतुक कोंडी व पुणे मुंबई महामार्गाकडे ये-जा करण्यार्या नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. पिंपरीगाव व परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडीची देखील समस्या सुटणार आहे.










Leave a Reply