राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर
Pckhabar- राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या कार्यालयात नुकताच युवक काँग्रेसचा पदनियुक्ती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, लाला चिंचवडे आदी उपस्थित होते.
शहर सरचिटणीस ऋषभ भरत काटे, विराज दत्तात्रय काळभोर, संकेत नंदकुमार इंगवले, आयुष निंबाळकर, अमोल बाळासाहेब देवकर तसेच शहर उपाध्यक्ष भट्टू प्रकाश शिंदे, पवन गंगाधर जवळकर, विशाल मुकूंद उबाळे, गौरव सचिन शितोळे, सुशिल कुमार घग, शहर सचिव प्रदिप प्रकाश आवटी, शहर संघटक तेजस शंकर चिकणे, चिंचवड विधानसभा सरचिटणीस प्रणव प्रकाश ढमाले, पिंपरी विधानसभा संघटक शेहबाज नाजीर शिकलगार, पिंपरी विधानसभा सरचिटणीस दयानंद मोरे, विराज कुटे, भोसरी विधानसभा संघटक शैलेश विश्वनाथ मोरे, कौस्तुभ संतोष वाळके, आकाश पवार, भोसरी विधानसभा सरचिटणीस स्वप्निल विठ्ठल माने, भोसरी विधानसभा सचिव श्रीयश अनिल चिखले तसेच चेतन जभम्बले, केतन जाधव, गणेश गाडेकर, वसिम बागवान, स्वप्निल काटे, अभिषेक जमादार यांना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. सुत्रसंचालन विशाल काळभोर, आभार लाला चिंचवडे यांनी मानले.










Leave a Reply