घरातच बनावट नोटांचा छापखाना, दोन हजाराच्या नोटा छापणारे तिघे जेरबंद
तीन लाखाचा ऐवज जप्त
Pckhabar- कोरोना साथीच्या लॉकडाऊन कालावधीत घरातच बनावट नोटांचा छापखाना सुरू करून चलनातील दोन हजाराच्या नोटा छापणा-या तीन जणांच्या पिंपरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या. तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निगडीतील घरकुल येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामागे रॅकेट असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.
अभिषेक प्रदीप कटारिया, (वय १९ वर्ष, रा. सी-२०४/२०५, रौयल कोर्ट, आनंद पार्क, थेरगाव) , ओंकार शशिकांत जाधव, (वय १९ वर्षे, रा. कुणाल इस्टेट, ए-६/२७, केशबनगर, हिंशन, पुणे ), सुरेश मगवान पाटोळे, (वय ৪০ वर्ष, रा सरव ने २९, ऑकार नगर, प्राटेस्ती आनंदवन आश्रम, फुगेवाडी) , पुणे यांना अटक करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र बंद असल्यामुळे घरी कोणीही येणार नाही याची खात्री या दोन तरूणांनी केली होती. त्यामुळे त्यांनी घरातच बनावट नोटा प्रिंट करणे सुरू केले. केवळ दोन हजार रूपयांच्या नोटांची छपाई त्यांनी
केली. अनलॉक जारी झाल्यानंतर त्यांनी या नोटा शहरातच वस्तू खरेदी करण्यासाठी वापरल्या. बाजारात २००० च्या बनावट नोटा व्यापा-यांकडे आल्यामुळे एकच खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपास सुरू
झाला. निगडी – घरकुल परिसरात दोन तरुणांनी घरात नोटा छापल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार, पिंपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि त्यांच्या पथकाने या घरावर छापा टाकून तिघांना जेरबंद केले.
तिघांकडून तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत बनावट नोटा आणि नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांना पुण्यातील एका मित्राने मदत केली. तसेच मुंबईतील एक व्यक्तीही या तरुणांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणामागे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










Leave a Reply