Pune news कोरोनाविरोधात लढण्यात पुणेकर सक्षम!

पुणेकरांच्या शरिरात कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होऊ लागली
Pckhabar-कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यातील लोकांमधे आता कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे सेरेलॉजीकल सर्वेक्षणातुन समोर आले आहे. इंडियन इनस्टीट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च या संस्थेने 20 जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण केले आहे.
पुण्यातील येरवडा, कसबा पेठ- विश्रामबाग, रास्ता पेठ- रविवार पेठ, लोहिया नगर- कासेवाडी, नवीपेठ- पर्वती या भागातील 1664 नागरीकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे

या भागातील 51.05 नागरिकांमधे कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या एंटीबॉडीज आढळून आल्यात.

कोरोनाची बाधा होण्यात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव दिसून येत नाही. 52.8 पुरुषांना तर 50.1 महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.

66 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांमधे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 32.6 टक्के आहे तर सर्वाधीक प्रमाण हे 51 ते 65 वयोगटातील लोकांमधे आहे. जे 50.0 टक्के इतके आहे.

कोरोनाचा सर्वाधिक 56 ℅ ते 62 % फैलाव हा चाळीत किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये आहे.

सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव सर्वाधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *