पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची माळ डॉ. राजेश देशमुख यांच्या गळ्यात

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची माळ डॉ. राजेश देशमुख यांच्या गळ्यात
अजितदादांनी दिली पंसती, pckhabar चे वृृृृृत्त खरे ठरले

Pckhabar- पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी हाफकीन इन्स्टिट्यऊटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांची आज (सोमवारी) नियुक्ती केली आहे. अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी देशमुख यांच्या नावाला पसंती दिली आहे.

नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारीपद पश्‍चिम महाराष्ट्रात महत्वाचे मानले जाते. या पदावर येण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि स्पर्धा असते.

जिल्हाधिकारीपदासाठी लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, मुंबई ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, ‘पीएमआरडी’चे आयुक्त सुहास दिवसे आदींची नावे चर्चेत होती. त्यामध्ये डॉ. राजेश देशमुख यांनी बाजी मारली आहे. त्यांच्याजागी हाफकीन इन्स्टिट्यऊटचे व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. देशमुख यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याबाबत pckhabar.com ने बातमी दिली होती. Pckhabar ची बातमी तंतोतंत खरी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *