Pavana Dam news पवना धरणातील पाणीसाठ्याची सत्तरीपार !
Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठ्यात १ जूनपासून 37.24 टक्के वाढ झाली असून 24 तासात 4.73 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
❄️ गेल्या २४ तासात झालेला पाऊस = १०८ मि.मि.
❄️ १ जूनपासून झालेला पाऊस = १,१९३ मि.मि.
❄️ गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = ३,११९ मि.मि.
❄️ धरणातील सध्याचा पाणीसाठा = ७२.५३ टक्के
❄️ गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = ९८.६२ टक्के
❄️ गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= ४.७३ टक्के
❄️ १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = ३७.२४ टक्के










Leave a Reply