Crime news ज्येष्ठ महिलेला मारहाण करत लुटणारे दोघे गजाआड
Pckhabar- केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या नोकराने मित्राच्या मदतीने ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन सव्वा चार लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दोन चोरट्यांना निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून दुचाकी आणि चोरीचा माल असा 1 लाख 24 हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.
दीपक उर्फ दिप्या अंकुश सुगावे (वय 20, रा. कल्पना सोसायटी, तळेगाव दाभाडे) आणि संदीप उर्फ गुरु भगवान हांडे (वय 24, रा. चिंचवडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका केअर टेकर सेंटरमध्ये दोन्ही आरोपींची एकमेकांशी ओळख झाली. दीपक हा दोन महिन्यांपूर्वी संबंधित ज्येष्ठ महिलेच्या घरातील सर्व साहित्य व वेळेची माहिती जून महिन्यात त्याने संबंधित महिलेच्या घरी केअर टेकर म्हणून कामाला होता.
मात्र, संबंधित महिला घरी एकटी असते व घरात मौल्यवान वस्तू कुठे आहेत ते त्याने हेरले होते. 10 ऑगस्टला रात्री दोघेजण घराशेजारील उद्यानाच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून ज्येष्ठ महिलेच्या घरात आले. महिलेला चाकूचा धाक दाखवून तसेच हातावर काठीने मारहाण करत त्या दोघांनी 4 लाख 30 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता.
उच्चभ्रू वस्तीमध्ये हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या एकटे राहण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान, या घटनेनंतर निगडी पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपी थरमॅक्स चौक येथे चोरीचा माल विक्रीला घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. सुगावे याने तळेगाव येथे लपून ठेवलेले साहित्य व इतर वस्तू पोलिसांना काढून दिल्या. तसेच, त्या गुन्हयात वापरलेली दुचाकीही हस्तगत केली.










Leave a Reply