Pune news: ‘मला माझे काम करु द्या’, पार्थप्रकरणी वडील अजितदादांचे मौन कायम

Pune news: ‘मला माझे काम करु द्या’, पार्थप्रकरणी वडील अजितदादांचे मौन कायम

मुंबईतून शरद पवार पुण्यात दाखल

Pckhabar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना जाहीरपणे खडसावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपले मौन अद्याप सोडले नाही. याबाबत ‘मला कोणाशीही काही बोलायचे नाही, मला माझे काम करु द्या’ असे अजित पवार यांनी ऑफ कॅमेरा सांगत जाहीर भाष्य करण्यास नकार दिला. आज अजितदादा आणि पार्थ बारामतीत असून शरद पवार हे देखील मुंबईतून पुण्यात दाखल झाले आहेत.

पार्थ पवार यांनी शनिवारी काका श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जाऊन घडलेल्या प्रकरणावर चर्चा केली.
पुण्यातील ध्वजारोहन आटोपल्यानंतर अजित पवार बारामतीत पोहचले आहेत. रविवारी सकाळपासून अजित पवार बारामतीतील विकास कामांची पाहणी करत आहेत. पार्थ प्रकरणावर अजितदादांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. मात्र अजित पवार यांनी याबाबत मौन बाळगले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पत्नीसह पुण्यात आले आहेत. शरद पवार दुपारनंतर बारामतीला रवाना होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *