देहूगाव येथील अभंग प्रतिष्ठानतर्फे कोविड योध्दांचा गौरव
Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीतही अविरत सेवा करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य परिचारिका , कर्मचारी, स्वयंसेवक, पोलिस या कोविड योध्दांना अभंग प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव, डॉ.विद्या यादव,डॉ. रणजित कांबळे, डॉ. प्रेसी डेव्हिड, डॉ. सानिया मुजावर, डॉ. शृतिका, डॉ प्राजक्ता, डॉ.निकिता, डॉ. योगिता, डॉ. कुलदीप ढोले , डॉ.माधवी भालेराव, प्रतीक्षा वाघमारे, गौरव सदामते, निलेश पवार, प्रदीप शिंदे , समिर चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, युवा स्वयंसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्या संकट काळात कोविड सेंटरमध्ये प्रत्यक्ष कार्य करणारे डॉक्टर, आरोग्य परिचारिका, कर्मचारी वृंद, युवा स्वयंसेवकांचे काम आदर्शवत आहे. या सन्मानप्रसंगी अभंग प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.










Leave a Reply