मी लवकरच बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होईल- नवनीत राणा
प्रकृती स्थिर असल्याची नवनीत राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माहिती दिली
Pckhabar- अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यामुळे त्यांना आज आयसीयूमधून सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे. राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना प्रथम अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयामधअये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्बेत आणखीनच बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नवनीत राणा यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता त्यांची प्रकृति स्थिर झाल्याने त्यांना आयसीयूमधून सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे. याबाबत स्वत: नवनीत राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माहिती दिली आहे. “आज मला आयसीयूमधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृति थोडी स्थिर आहे, आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार” असे नवनीत राणा यांनी फेसबुक पोस्ट करताना म्हटले आहे.










Leave a Reply