कोरोनाची लस आणि संशोधन
(डॉ. अंकुश जाधव)
Pckhabar- कोरोनाच्या साथीने त्रस्त झालेले जगातील सर्वच देश विविध प्रकारच्या उपाययोजना करून आपल्या नागरिकांना कोरोना पासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हजारो शास्त्रज्ञ यावर परिणामकारक औषध शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भारतात दररोज कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात दररोज सरासरी ५८ हजार नवे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या २४ लाख झाली असून त्यापैकी एकूण ४७,०७७ लोकांचा मृत्यू झाला आहे तर १६ लाख९५ हजार पेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत.६ लाख५३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ कोटी ६८लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
ही वेगाने वाढणारी कोरोनाबधितांची संख्या पाहता यावर कितीही औषधे शोधून काढली तरी परिणाम कारक ठरणार आहे ती व्हाक्सिन अर्थात लसच आणि त्यासाठी कोरोना विषाणूमुळे कोरोना होतो हे माहीत झाल्यापासून हजारो शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयोगशाळेत काम करून कोरोनावर प्रभावी लस शोधण्याचे काम करीत आहेत.
लस म्हणजे विशिष्ट रोगाविरुद्ध कृत्रिम सक्रीय प्रतिक्षमता निर्माण करणारे औषध. लसीमुळे ज्या रोगासाठी लस तयार केली आहे. त्या रोगाविरुद्ध मोठया प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. एक प्रकारचे रोगप्रतिबंधक औषधच. जन्मल्या पासूनच लसीची सुरुवात होते. अनेक प्रकारच्या लसी उपलब्ध असून त्यामुळेच अनेक रोगांपासून मानवाचे रक्षण झाले आहे.
कोणतीही लस बाजारात एकदम येत नाही.बाजारात येण्यापूर्वी त्या लसीला विविध प्रकारच्या चाचण्या च्या कसोटीतून जावे लागते. त्याला”क्लिनिकल ट्रायल” असे म्हणतात. विशिष्ट औषध लसीचा मानवावर प्रयोग करण्यापूर्वी ते औषध मानवा प्रमाणेच शारिरीक रचना असणाऱ्या इतर सजीव प्राण्यांवर वापरून पाहिले जाते.
त्या प्राण्यांवर त्या औषधाचा कोणताही दुष्परिणाम दिसला नाहीं तर ते मानवावर उपयोगी असल्याचे समजण्या येते व नंतर त्या औषधाचे मानवा प्रयोग केले जातात. ही मानवावरची चाचणी विविध प्रकारची शारिरीक स्थिती असणाऱ्या मनुष्यांवर केली जाते. त्यात ती पूर्ण पणे निर्दोष आढळल्यानंतरच त्याचा उपयोग अन्य मनुष्या/लोकांवर केला जातो. यासच “क्लिनिकल ट्रायल” असे म्हणतात.
रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी रशिया ने जगात पहिली लस बनविल्याचा दावा केला आहे.
आज जगात लस विकसित करण्यासंबंधी पुढील प्रमाणे स्थिती आहे.–
१)किती लसींवर काम सुरू आहे –१६५.
२)किती लसीच्या चाचण्या पहिल्या टप्प्यावर आहेत-१३९.
३)किती लसीची चाचणी मानवा वर सुरू आहे–२६.
४)किती लसीची मानवावर तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू आहे-०६.
(संदर्भ .लोकमत १२ ऑगस्ट)
रशियातील मास्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ने ही जगातील पहिली कोरोना ची लस बनविली असून त्यांनी सर्व क्लिनिकल ट्राइल्स पूर्ण केल्याचा दावा केला आहे.रशिया ने या लसीचे नाव”स्पुटनिक व्हि” असे ठेवले आहे.
परंतु ही लस आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नाही. लस पूर्ण विकसित होण्यासाठी सुरवाती पासून शेवटपर्यंत साधारणपणे १२ ते१८ महिने लागतात. कोरोना साठी लस अत्यावश्यक म्हणून जरी समजली तरी८ते१० महिने तरी लागतात.
भारत बायोटेक तयार केलेल्या”कोव्हक्सिन” या लसीच्या मानवी चाचणी चा दुसरा डोस नुकताच दिला गेला. ही चाचणी भारतात १२ सेंटर वर सुरू आहे. या चाचण्यांत मानवात किती प्रमाणात अँटिबोडिज वाढल्या हे तपासले जाणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पुनावाला यांनी भारतात डिसेंबर पर्यंत लस उपलब्ध होईल असे म्हंटले आहे. ऑक्सफोर्ड विधापीठा सोबत ही लस विकसित केली जात आहे. येणारी लस ही सुरक्षित व प्रभावी असणे आवश्यक आहे.
सर्व समान्य माणूस कोरोना च्या भीतीने लसीकडे मोठया आशेने पाहत आहे.ती लवकरात लवकर येवो अशी प्रार्थना करीत आहे. परंतु सर्वांनी हे ही लक्ष्यात घ्यावे की किती झाले तरी लस तुमच्या पर्यंत पोहचण्यासाठी कित्येक महिने लागतील. तो पर्यंत तुम्ही मनात भीती ठेऊनच जगणार काय?कदाचित तुम्हाला कोरोना होऊन ही गेला असेल. दिल्लीतील २५ टक्के व मुंबईत १७ टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचे माहीत ही नाही.
लसीची फार लवकर अपेक्षा न करता तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवा. योग्य ती सर्व प्रकारची काळजी घ्या.
आपली तब्बेत चांगली ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी पुढील गोष्टी करा. योग्य आहार, कोणत्याही स्वरूपाचा नियमित व्यायाम,७ ते ८ तास शांत झोप, पचनसंस्था चांगली ठेवणे(मिक्रोफ्लोरा ७०टक्के रोगप्रतिकारक शक्तीचे वास्तव्य पोटातील आतड्यात असते. म्हणून पोटाचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे.), मानसिक शांतता, थोडा वेळ तरी सूर्यप्रकाशात राहणे, चांगल्या मित्रांशी संबंध ठेवणे, मनोबाल मजबूत ठेवणे, स्वतःची स्वच्छता ठेवा, मास्क चा योग्य वापर करा, केवल शोभेसाठी गळ्यात अडकवू नका, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा, वारंवार साबणाने हात धुवा,
बाहेरून आल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करा, बाहेरचे कपडे त्वरीत साबणाने धुवून टाका, स्वतःची काळजी घ्या, कोरोना ची भीती मनातून काढून टाका. उगाच लसी ची वाट बघत कोरोना कोरोना करू नका.
‘कोरोनाची लस आणि संशोधन’










Leave a Reply