ऑटोक्लस्टर, बालनगरी येथील कोरोना केअर सेंटरची महापौर व पक्षनेत्यांकडुन पाहणी

ऑटोक्लस्टर, बालनगरी येथील कोरोना केअर सेंटरची महापौर व पक्षनेत्यांकडुन पाहणी
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरात वाढता कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुभावामुळे रुग्णांच्या संख्येत दरदिवशी वाढ होत आहे. या रुग्णांसाठी महापालिकेची रुग्णालये, दवाखान्यामध्ये खाटांची संख्या अपुरी पडत असल्याने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सेंटर व इंद्रायणीनगर भोसरी येथील बालनगरी येथे कोरोना सेंटर तयार करण्यात येत आहे. या दोन्ही सेंटरमध्ये सुरु असलेल्या कामाची आज महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपायुक्त अजय चारठणकर यांनी पाहणी केली.
ऑटो क्लस्टर व बालनगरी हे शहराच्या मध्यभागी येत असल्याने कोरोना रुग्णांसाठी या जागा सोयीच्या होणार असल्याने ऑटो क्लस्टर सेंटरमधील दोन मोकळ्या हॉलमध्ये ५० आयसीयु व १५० हायर ऑक्सीजन बेडची उभारणी करण्यात येत आहे. तसेच बालनगरी येथे ४०० सीसीसी बेडची उभारणी सुरु असुन ४ दिवसात हे काम पुर्ण होवुन त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरु होणार आहेत.
गुरुवार दि. १३ ऑगस्ट पासुन वायसीएम रुग्णालयात असणाऱ्या ३० आयसीयुसाठी ऑक्सीजन सिलेंडरमार्फत पुरवठा चालू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वायसीएम रुग्णालयांमध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सीजन पुरवठा उपलब्ध होण्यासाठी वायसीएम रुग्णालयाच्या परिसरात नव्याने 20KL ऑक्सिजन टँकची उभारणी केली जात आहे. या ऑक्सिजन टँक प्रकल्पाच्या निर्मितीमुळे रुग्णालयामध्ये कायमस्वरुपी ऑक्सिजन, आयसीयू बेडसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देखील महापौर व पक्षनेते यांनी प्रशासनाला दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *