आदित्य बिर्ला रुग्णालयाला कोरोना बिलासंदर्भात आणखी एक नोटीस

आदित्य बिर्ला रुग्णालयाला कोरोना बिलासंदर्भात आणखी एक नोटीस

Pckhabar- चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयाला कोरोना रुग्णांच्या बिलासंदर्भात आणखी एक नोटीस बजाविली आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या बिलांच्या तपासणी समितीस काही त्रुटी आढळल्याने समितीचे प्रमुख तथा आयकर विभागाचे सह आयुक्त एन.अशोक बाबू यांनी रुग्णालय प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील खासगी रुग्णालयामध्ये कोविड-19 या आजाराने बाधीत झालेल्या रुग्णांची येणारी वैद्यकीय खर्चाची बिले अवास्तव रकमांची येत आहेत. अशा स्वरुपाच्या लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने बिलांची तपासणी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या खासगी रुग्णालयामधील रुग्णांना शासकीय दरपत्रकाप्रमाणे व वाजवी दराने आकारणी केली जाते किंवा कसे? याची पडताळणी करण्याकामी आयकर विभागाचे एन.अशोक बाबू यांची नियुक्ती केली आहे.

त्यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला बिलांची तपासणी करण्यासाठी भेट दिली. वैद्यकीय समितीस काही त्रुटी आढळून आल्या. याबाबत रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. नोटीस मिळाल्यापासून 48 तासांमध्ये खुलासा करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *