४८ तासांत माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा
Pckhabar- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरुन राजकारणाला जोर येत आहे. सुशांतच्या मृत्युप्रकरणात शिवसेना आणि भाजपा ऐकमेकांना लक्ष्य करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांचे दुसरे लग्न झाल्याचे सांगत सुशांत व त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते, असा दावाही राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या विधानावरुन सुशांतच्या कुटुंबीयांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येताच शिवसेनेचे खासदार राऊत मैदानात उतरले. केवळ मैदानात उतरलेच नाहीतर तर राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोपही केले. सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपामुळे चिडलेल्या सुशांतच्या कुटुंबाने संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतचा चुलत भाऊ आणि आमदार नीरज कुमार सिंग बबलु यांनी संजय राऊतांनी केलेले सगळे आरोप धुडकावून लावलेत. शिवाय या आरोपांवर तीव्र संताप व्यक्त केला.
राऊत यांनी आमच्या कुटुंबावर केलेला लज्जास्पद आरोप निंदनीय आहे. याविरोधात आम्ही मानहानी दावा करू, असे नीरज यांनीम्हटले आहे. त्यानंतर, आता राऊत यांना चुलत भावानं नोटीस पाठवली आहे. ‘तुम्ही केलेल्या वक्तव्यांबद्दल ४८ तासांत माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा,’ असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.
याबाबत ‘टाइम्स नाउ’ या वृत्तसंस्थेनं वृत्त दिलं आहे.
४८ तासांत माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा










Leave a Reply