(डॉ. अंकुश जाधव)
Pckhabar- कोरोना ची महासाथ जगभर सुरू असून कोरोनाच्या विषाणूचा नायनाट करण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. भारतात आतापर्यंत 22लाख 25 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी 15 लाख 35 हजार लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर देशासह महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केल्याने रूग्ण संख्याही वाढत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबधितांची व बळींची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत5 लाखा पेक्षा अधिक कोरोनाबधित असून त्यांपैकी 17,777लोकांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्यांची संख्या 3.50 लाखापेक्षा अधिक आहे. आता एकूण 1 लाख 63 हजारापेक्षा अधिक लोक उपचाराधीन आहेत.
महाराष्ट्रात 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला. तेव्हापासून कोरोनाचे महाराष्ट्रात 1 लाख रुग्ण होण्यासाठी 97 दिवस लागले. 2 लाख रुग्ण होण्यासाठी 118 दिवस लागले. (21दिवस), 3 लाख होण्यासाठी 133दिवस (15 दिवस), 4 लाख होण्यासाठी 144 दिवस (11दिवस), तर 5 लाख होण्यासाठी 154 दिवस (10दिवस) लागले. जस जशी चाचण्याची संख्या वाढत गेली तस तशी रुग्णाची संख्या वाढत गेली.
कोरोनाच्या साथीत महाराष्ट्र शासनाने देशात सर्वात चांगली कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यात चाचण्याची संख्या अत्यंत कमी आहे किंबहुना तेथे विशेष चाचण्या केल्याच जात नाहीत. आतापर्यंत सिद्ध झाले आहे की, 80 टक्के लोकांना कोणतीही लक्षणे नसतात. 15 टक्के लोकांना साधारण व मध्यम स्वरूपाची लक्षणे असतात. 5 टक्के लोकांना गंभीर स्वरूपाची लक्षणे असतात. या 5 टक्के पैकी 2.94 टक्के लोकांना ऑक्सिजनची, 2.94टक्के लोकांना आयसीयूची तर 0.45 टक्के लोकांना व्हेंटिलेटरची गरज असते.
जागतिक आरोग्य संघटनेने, कोरोना कदाचित अनेक वर्ष आपल्यात राहिल, कोरोना बरोबरच जगायला लागेल, असे सांगितले आहे. कोरोना बरोबरच जगायचे म्हणजे काय? सर्व आरोग्य यंत्रणांचा योग्य तो उपयोग करून कोरोनाबधितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नाबरोबरच रोजचे व्यवहार सुरू ठेवणे. तसेच लोकांचा संपर्क कमीत कमी कसा येईल ते पाहून त्याद्वारा संसर्गाची शक्यता कमी करणे. या दृष्टीने योग्य ती पावले उचलणे.
दररोज एकूण कोरोनाबधितांची संख्या जाहीर करताना त्यातून बरे झालेल्या रुग्णाचा आकडा वजा करून तो आकडा जाहीर करावा. कोरोनाबधितांच्या मृत्यूची आकडेवारी देतानाही भारतात, महाराष्ट्रात कोरोना बरोबरच अन्य कोणत्या कारणांनी किती लोकांचा मृत्य झाला ते ही सांगावे. तसेच दोन्हीची टक्केवारी द्यावी म्हणजे लोकांच्या मनात कोरोना हा घातक, गंभीर आहे असा जो लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे तो दूर व्हायला मदत होईल.
मास्क लावणे, योग्य ते अंतर ठेवणे, खुल्या हवेत राहणे, परंतु गर्दीत न जाणे, वारंवार हात साबणाणे धुणे, बाहेरून आल्यावर बाहेरचे कपडे धुणे, अंघोळ करणे आदी विषयी समाजजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. लोकांनी ही यास आपल्याच संरक्षणासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची राज्यभर साखळी उभी करावी व जी आहेत त्यात सुधारणा कराव्यात. सार्वजनिक आरोग्य सेवेचे सरकारी करण आहे ते तसेच ठेवावे, त्यात वाढ व्हावी परंतु तिचे खाजगीकरण होऊ देऊ नये.
कोरोनासंबंधी भीती, गैरसमज दूर केल्याशिवाय सर्वच बाबतींत उभारी येणे कठीण आहे. कारण अनेक आजार हे मानसिक ताणतणाव यामुळे होतात व वाढतात. कोरोनाच्या महासाथीत मानसिक आजार वाढलेत हे सिद्ध झाले आहे.
आजजी अलोपॅथी डॉक्टरांनाच कोरोनावर उपचार करण्याची परवानगी आहे, ती आयुर्वेदिक डॉक्टरांना द्यावी. परंतु ती आपल्या आयुर्वेदिक उपचारांमुळे रुग्णास काही हानी पोहचल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी. या पनवेल महानगरपालिकेप्रमाणे नसावी. डॉक्टरांच्या सहकार्याने आयुर्वेदाचा उपयोग कोरोना उपचारात करून घ्यावा. स्वाईन फ्ल्यू, चिकणगुनिया सारख्या साथीच्या आजारात आयुर्वेदिक औषधांचा चांगला उपयोग होतो, असे दिसून आले आहे.
भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती व मानसिक बळ हे अन्य कोणत्याही देशा पेक्षा चांगले आहे. हे आतापर्यंत दिसून आले आहे. त्याचाच उपयोग करून सर्वांच्या मदतीने, संघटितरित्या कोरोनाला हरवणे शक्य आहे.

Post Views: 233

Leave a Reply