उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

Pckhabar- राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आज (मंगळवारी) शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून गडाख विधानसभेवर अपक्ष निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनाला पाठिंबा दिला असून महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून ते मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे मृद व जलसंधारण खात्याच्या जबाबदारीसह उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील आहे.

शिवसेना प्रवेशानंतर पालमंत्री शंकरराव गडाख म्हणाले, ”शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी,गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून यापुढे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतूत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *