पिंपरी-चिंचवड शहरात कोणत्या भागात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण?

पिंपरी-चिंचवड शहरात कोणत्या भागात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण?

Pckhabar- पिंपरी-चिंचवड पालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 1807, त्याखालोखाल ‘फ’ प्रभागाच्या हद्दीत 1456 सक्रिय रुग्ण आहेत. हे प्रभाग कोरोना हॉटस्पॉट झाले आहेत. महापालिकेने सोमवारी रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे.

शहरात 10 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 29 हजार 836 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 21 हजार 208 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 5146 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 496 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 1078 सक्रिय रुग्ण आहेत. प्रभागातील रुग्णसंख्या दोन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात येत आहे.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात 1409 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 619 रुग्ण आहेत.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे सर्वात कमी म्हणजेच 759 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे सर्वाधिक 1807 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 1456 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 1222 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे सर्वांत कमी म्हणजेच 592 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *