प्राधिकरणातील उच्चभ्रू सोसायटीत जबरदस्तीने घुसून चोरट्यांनी वृद्ध महिलेला मारहाण करत दागिने पळविले
Pckhabar- प्राधिकरणातील एका उच्चभ्रू सोसायटीत जबरदस्तीने घुसून चोरट्यांनी वृद्ध महिलेला जबर मारहाण करत सोन्याचे दागिने पळवले. हा प्रकार आज मंगळवारी पहाटे घडला. यामध्ये वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निगडी प्राधिकरण येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने चोरले. वृद्ध महिलेने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी वृद्ध महिलेला जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला निगडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.










Leave a Reply