मुलाच्या वाढदिवसानिमित्त उपसरपंच स्वप्निल काळोखे यांच्यातर्फे कोविड -19 रुग्णांसाठी व्हिटॅमिन “सी” टॅब्लेट्सची मदत
Pckhabar- श्रीक्षेत्र देहूचे उपसरपंच स्वप्निल काळोखे यांचे चिरंजीव शिवतेज याच्या द्वितीय वाढदिवसाच्या निमित्ताने कोविड -19 पेशंटसाठी काळोखे यांनी देहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 15 हजार रुपये किमतीच्या झिंक, कँल्शियम, व्हिटॅमिन “सी” टॅब्लेट्स देऊन मदत केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण केले.
याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, व्याख्याते प्रा. सचिन ढोबळे, वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर यादव उपस्थित होते. गतवर्षी कु. शिवतेजच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने जि. प. विठ्ठलवाडी शाळेस फॅन, लाईट फिटिंग इत्यादी शाळेची कामे केली होती. तसेच वृक्षारोपण करण्यात आले होते.
सामाजिक बांधिलकी जोपासत स्वप्निल काळोखे विविध लोकाभिमुख उपक्रम सातत्याने राबवत असतात. काळोखे यांचे कार्य इतरांसाठी नक्कीच हा आदर्श आहे.










Leave a Reply