चिखलीतील आक्या बॉण्ड टोळीवर मोका
Pckhabar- निगडी, चिखली परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आक्या बॉण्ड टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली आहे. या टोळीवर 18 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
आकाश ऊर्फ सुमित ऊर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहोळ (वय 19, रा. महालक्ष्मी हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव (वय 22, रा. जिजामाता हौसिंग सोसायटी, शरदनगर, चिखली) शोएब इजराईल शेख (वय 19, रा. साई कृपा हौसिंग सोसायटी, घरकुल) विशाल रामधन खरात (वय 20, रा. फातिमा मज्जीद समोर, ओटास्किम) व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव आणि आक्या बॉन्ड यांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्फत तयार करून पाठविला.
आरोपींनी संघटितपणे एकूण 18 गुन्हे केले आहेत. त्यांच्या त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन 1999 अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार केला.
पी.सी.बी. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी प्रस्तावातील कागदपत्रांची छाननी करून त्रुटींची पूर्तता केली. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली.










Leave a Reply