शहर मराठा क्रांती मोर्चातर्फे कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध
Pckhabar- बेळगाव मधील मनगुत्ती या गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविलेल्या कर्नाटक भाजप सरकारच्या शिवद्रोही कृतीचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरक्षि अंतराचे पालन करत सोमवारी डांगे चौकात निषेध केला.
मराठा क्रांती मोर्चा समन्व्यक मारुती भापकर म्हणाले, कर्नाटक सरकार जाणूनबुजून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वाद निर्माण करून प्रांतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटक सरकारने अनेक वेळा शिवभक्तांच्या भावना दुखवण्याचे काम केले आहे. सीमा भागात असणार्या मराठा बाधंवाना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अशा भावनिक मुद्यावर घाणेरडं राजकारण हे भाजपा सरकार वारंवार करत असल्याचा आरोप भापकर यांनी केला.
राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष विशाल वाकडकर, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक प्रकाश जाधव, सतीश काळे, गणेश दहिभाते, ज्ञानेश्वर लोभे, आदिनाथ मालपोटे, रशीद सय्यद, परमेश्वर जाधव, अभिषेक म्हसे, परशुराम रोडे आदी उपस्थित होते.










Leave a Reply