15 ऑगस्टपर्यंत कोविड सेंटरचे काम पूर्ण न झाल्यास ‘खळ्ळखट्याक’; मनसेचा इशारा

15 ऑगस्टपर्यंत कोविड सेंटरचे काम पूर्ण न झाल्यास ‘खळ्ळखट्याक’; मनसेचा इशारा
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरचे काम 15 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण न झाल्यास खळखट्याक करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. अशी माहिती मनसेचे गटनेते, नगरसेवक सचिन चिखले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 27 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्याची बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता, नेहरूनगर, बालनगरी आणि चिंचवडच्या ऑटो क्लस्टर या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. पैकी, चिंचवड येथील कोविड सेंटरची पाहणी गटनेते सचिन चिखले यांनी केली. यावेळी मनसे उपशहराध्यक्ष राजु सावळे, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, अंकुश तापकीर तसेच मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा, तिथे काम सुरू झाले नसल्याचा आरोप करत 15 ऑगस्ट पर्यंत कोविड सेंटर उभं न राहिल्यास महापालिकेमध्ये खळखट्याक करण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *