आमदार लांडगे यांच्या मध्यस्तीमुळे बिर्ला हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा संप मागे
Pckhabar- आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळे आदित्य बिर्ला रुग्णालयातील कर्मचार्यांचा संप मिटला आहे.
चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयातील कर्मचार्यांनी संप सुरू केला होता. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी हा संप मिटविण्यासाठी पुढाकार घेतला.
कर्मचारी प्रतिनिधी आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात आली. तत्पूर्वी, आमदार लांडगे यांनी रुग्णालय आवारात संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांशी संवाद साधला.
आमदार लांडगे यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये गेले 3 दिवस सुरू असलेले डॉक्टर आणि नर्स यांनी आंदोलन मागे घेऊन वैद्यकीय सेवा सुरु करण्यास सुरुवात केली.










Leave a Reply