पुणे जिल्हाधिकारी पदासाठी ‘ही’सहा नावे चर्चेत  

पुणे जिल्हाधिकारी पदासाठी ‘ही’सहा नावे चर्चेत  
Pckhabar- पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच पुण्याचे   जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पंतप्रधान कार्यालयातील उपसचिवपदावर  बढती मिळाली. त्यानुसार राम यांनी आज (सोमवार) पंतप्रधान कार्यालयातील उपसचिवपदचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे पुण्याचा नवा प्रशाकीय कारभारी कोण? याबाबत चर्चा रंगली असतानाच सहा अधिकार्‍यांची नावे चर्चेत आहेत.

  दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तात्पुरती जिल्हाधिकार्‍याची जबाबदारी देण्यात आली आहे. नवीन जिल्हाधिकार्‍यांचे नाव आजच रात्री जाहीर होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं महत्वाचं जिल्हा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे जिल्ह्यात मर्जीचा अधिकारी नियुक्त करण्यावर भर आहे.

  पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख सर्वाधिक प्रबळ दावेदार आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारीपदी काम केलं आहे. तर म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, एमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, लातूर जिल्हाधिकारी जी श्रीकांत, नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांचीही नावे चर्चेत आहेत.
दरम्यान, पालकमंत्री अजित पवार या सहा अधिकाऱ्यांपैकी एकाला संधी देतात की अन्य अधिकाऱ्याची नेमणूक करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *