मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना अटक; चार लाखांच्या दहा दुचाकी जप्त

मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना अटक; चार लाखांच्या दहा दुचाकी जप्त
Pckhabar-  मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणार्‍यांना दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.  
स्वप्निल राजू काटकर (वय 19, रा. दिघीरोड, आदर्शनगर, भोसरी), राहुल मोहन पवार (वय 19, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस भोसरी परिसरात गस्त घालत होते. भोसरी उड्डाणपुलाच्या खाली आळंदी रोड येथे दोघेजण संशयितरीत्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी उड्डाणपुलाच्या खाली सापळा लावत आरोपी स्वप्नील व राहुल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही दुचाकींबाबत विचारपूस केली असता त्या दुचाकी चोरीच्या असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींनी चोरलेल्या इतर आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी चार लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या सर्व दुचाकी आरोपींनी भोसरी, एमआयडीसी भोसरी, खडकी, सांगवी परिसरातून चोरल्या आहेत.
      ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पाकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रविंद्र गावंडे, सचिन उगले, गणेश सावंत, विजय मोरे, विशाल भोईर, नितीन खेसे यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *