Good News पिंपरी-चिंचवड शहरातील 20 हजार रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील 29 हजार 157 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील तब्बल 20 हजार 264 नागरिकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल 69.49 टक्के आहे. तर, आजपर्यंत शहरातील 485 जणांचा मृत्यू झाला असून त्याचे प्रमाण 1.66 टक्के आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा पुन्हा ‘रेडझोन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णसंख्या वाढत असली. तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे. 10 मार्चपासून आजपर्यंत शहरातील 29,157 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण फक्त 1.16 टक्के आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच बाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-यांचे प्रमाण जास्त आहे. आजपर्यंत बाधित झालेल्या 29 हजार 157 पैकी तब्बल 20 हजार 264 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.49 टक्के आहे.
सध्या पालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये 4871 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तर, शहरातील खासगी रुग्णालयात, होम आयसोलेट असे सुमारे साडेतीन हजार सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील 485 जणांचा मृत्यू झाला असून त्याचे प्रमाण 1.66 टक्के आहे.










Leave a Reply