पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोनाचे 1 हजार 92 नवे रुग्ण; 952 जणांना डिस्चार्ज

पिंपरी-चिंचवड शहरात आज 1 हजार 92 नवे रुग्ण; 952 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात आज  रविवारी 1 हजार 92 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 29 हजार 197 झाली आहे. 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून 952 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजपर्यंत एकूण 20 हजार 264 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या 4 हजार 871 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील  चिंचवड (पुरुष 55 वर्ष), चिखली (पुरुष 80 वर्ष), किवळे (पुरुष 51 वर्ष), काळेवाडी (स्त्री 47 वर्ष), भोसरी (पुरुष 6 वर्ष), खराळवाडी (पुरुष 51 वर्ष), देहुरोड (स्त्री 47 वर्ष), कात्रज (स्त्री 44 वर्ष), चाकण (स्त्री 35 वर्ष), बिबेवाडी (स्त्री 63 वय), दौंड (पुरुष 14 वर्ष), चाकण (पुरुष 70 वर्षे), जळगाव (पुरुष 64 वर्ष) तसेच पुणे महापालिका हद्दीमधील रूग्णालयात मृत झालेले रूण (पुरुष 68 वर्ष), चिखली (पुरुष 51 वर्ष) चिंचवड (पुरुष 84 वर्ष), बोपखेल (पुरुष 78 वर्षे) येथील 17 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी 16 हजार 821 घरांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाने भेट दिली. त्यातील 55 हजार 202 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *