श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी उद्योजकाने दिली एक किलो चांदीची विट
विट विश्व हिंदू परिषदेकडे सुपूर्द
Pckhabar- श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी पिंपरी-चिंचवड मधील उद्योजक शशांक काळे यांनी एक किलो चांदीची वीट विश्व हिंदू परिषद यांच्याकडे सुपूर्द केली.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचा भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्ट २०२० रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यानिमित देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरा करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या श्रीराम मंदिराची प्रतीक्षा प्रत्येक हिंदूने पाहिली व ५०० वर्षानंतर हे स्वप्न पूर्णत्वास येत आहे, म्हणून अखंड देशभरातील प्रत्येक हिंदुमध्ये एक चैतन्याचे वातावरण आहे, या मंदिर निर्माणासाठी प्रत्येक हिंदू कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभागी होत आहे, असेच या वेळेस मुंबई क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे, चिंचवड विभाग मंत्री. नितीन वाटकर, भीमाशंकर जिल्हा मंत्री दयानंद शिंदे, मुकेश पाठक, प्रवीण फाकटकर आधी कार्यकर्ते उपस्थित होते.







Leave a Reply